कनेरसर चे मा.सरपंच श्री. सुधीरभाऊ माशेरे यांच्याकडून डिजिटल पाटीचे वाटप.*

Spread the love

कनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत कनेरसर गावचे माजी सरपंच,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.सुधिरभाऊ माशेरे यांसकडून डिजीटल पाटीचे शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. अंजली नामदेव शितोळे मॅडम यांनी केले केले. डिजीटल पाटीचे महत्व शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका सदानंद राक्षे मॅडम यांनी सांगितले.
गणिता सारख्या विषया मध्ये गणिते सोडवताना, कच्चे काम करावे लागते.त्या साठी वह्यांची पाने वापरावी लागतात.वह्यांची अनेक पाने खराब होतात. ही वह्यांची पाने तयार करताना अनेक झाडे तोडावी लागतात. त्या झाडांच्या लगदयापासुन कागद बनवीला जातो. एकीकडे झाडे वाचवा, झाडे जगवा,पर्यावरण वाचवा म्हटले जाते.या मुळे अनेक झाडे तोडली जातात.व पर्यावरणाचा र्‍हास होतो. या पाटीचा वापर केला तर पाटीवर पेन्सिलने लेखन करून डिलीट बटण दाबले की पुसून जाते. अशा प्रकारे पाटीमध्ये असणाऱ्या बॅटरीला एक सेल असतो. एका सेलमध्ये साधारण ५००० पेजेस लेखन होते .साधारण एका पेजेसला साधारण ५० पैसे खर्च येतो.वह्यांच्या किंमती फारच वाढल्या आहेत.डिजीटल पाटीमुळे खर्चाची बचत होते. व वृक्ष तोड थांबवून पर्यावरणाचा र्‍हास थांबेल असे सांगितले.
सदर कार्यक्रमास जि.प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब जन्याबा दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेव हरिभाऊ हजारे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.ज्ञानेश्वर किसन म्हसुडगे, माजी सरपंच श्री.सुधिरभाऊ माशेरे, श्री संदिप ज्ञानेश्वर म्हसुडगे शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शुभांगी डिगांबर जाधव यांनी मानले.
माननिय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा

प्रतिनिधी अस्सल न्यूज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents