


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट यांच्या वतीने ऊपजिल्हारुग्णालय मंचर येथे रुग्ण, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. सुशिल कांबळे, डॉ.सचीन कांबळे, डॉ नितीन कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते भोलेनाथ येवले,प्रा.अनिल निघोट, निघोटवाडी ग्रा.पं.सदस्य हिरामण पवार, शंकर डोकडे महाराज,मा.सैनिक मारूती निघोट, मंदाताई निघोट, संतोष रेणके, रुग्ण ,नातेवाईक व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रा.सुरेखा निघोट यांनी व उपस्थितांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरेंना वाढदिवस शुभेच्छा देताना त्यांच्या सारख्या देवदुतास, महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखास परमेश्वराने शंभर वर्षांचं आयुष्य द्यावं, ज्यांनी कोरोना काळात मराठी माणसांचे जीव वाचवण्यास प्रशासन आरोग्यदुतांमार्फत यंत्रणा उभी केली, शेतकरी राजांस कर्जमुक्ती दिली, सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन राज्य चालवले अशा महान व्यक्तीस सतत समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी दाखल रुग्ण व नातेवाईकांनी ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंना शुभेच्छा देऊन सर्वांना त्या आनंदानिमित्ताने खाऊ बिस्किट व फळवआटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.