
शिक्रापूर प्रतिनिधी : शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरात पानशॉप वर गुंगीकारक पदार्थ टाकुन पान बनवले जात असल्याने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अनेक ठिकाणी छाप टाकत पान मसाले व पावडर जप्त केले आहे.
शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा येथील शैक्षणिक क्षेत्राच्या परिसरात पानशॉप वर नशा व गुंगीच मसाला टाकुन पान बनवल जात त्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन युवक मोठया प्रमाणात या पानांच्या आहारी गेलेलं असताना हे पान धोकादायक असल्याची माहिती समजत आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करण्यास सुरवात केली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक अतुल पखाले, कृष्णा व्यवहारे यांनी सणसवाडी येथील सिद्धेश्वर पान शॉप, जय मल्हार पान शॉप, सिद्धेश्वर 27 पान शॉप, कोरेगाव भीमा येथील जय मल्हार, एस, के पान शॉप, शिक्रापूर येथील जय मल्हार, मोरया पान शॉप,येथे छापे टाकत पाहणी केली असता. त्यांना काही कोणते ही नाव व लेबल नसलेले प्रतिबंधित पान मसाले आढळून आले, दरम्यान सर्व पान मसाले जप्त करुन त्याचे नमुने अन्न व औषध विभागाकडे तपसाणीसाठी पाठवण्यात आले आहे.
त्या पावडर मसाले मध्ये जर गुंगीकारक पदार्थ आढळून आले तर सर्व पानशॉप चालकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असल्याचे क्षीरसागर साहेब यांनी सांगितलं आहे.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी
8767358432