
माळीण दुर्घटनेत बळी पडलेल्या १५१जणांना भावपूर्ण
आदरांजली.
माळीण दि.३० जुलै
आज बरोबर ९ वर्षापुर्वी निसर्गाच्या कोपात बळी पडलेल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील १५१ जणांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट यांनी आदरांजली वाहिली. ही काळरात्र अनेक आदिवासी बंधुभगीनींचे जीवन हिरावुन घेऊन गेली.या भयानक घटनेवेळी शासन व सर्वच घटकांनी दुर्घटनाग्रस्त माळीण ला सर्वोतोपरी मदत केली, जीवंत माणसं, गुरेढोरे कोसळलेल्या डोंगराखाली गाडली गेली, यातुन वाचलेल्यांसाठी शासनाने ६८ घरे बांधली,पण त्यांची गळती, पिण्याचं पाणी, माळीण गावात जाण्यास रस्ता, सभामंडप अशा समस्या आजपर्यंत बाकी आहेत, शासनाने त्या प्राधान्यक्रमाने सोडवल्या पाहिजेत, माळीण,रायगडातील ईर्शाळवाडी सारखी दुर्घटना येथुन जवळच पसारवाडीतही घडु शकते, तेथील ग्रामस्थ ही रोज जीवन म्रुत्य च्या छायेत जगत आहेत पण फक्त फोडाफोडी व सत्तेच्या राजकारणात गुंतलेली राज्य चालवणारी याकडे लक्ष देत नाहीत,शासन प्रशासनाने युद्ध पातळीवर सदर समस्यांचे निराकरण करावे अशी अपेक्षा यावेळी प्रा.सुरेखा निघोट यांनी केली.