
सुदर्शन मंडले
आळेफाटा प्रतिनिधी
आळेफाटा दि :- 26 आळेफाटा पोलिसांनी केली एक लाख आठ हजार रुपयांची अवैध दारू जप्त करण्यांत आली .आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांना मारुती सुझुकी या गाडीतून अवैधरीत्या दारूची वाहतूक होतं असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले .त्यानुसार पिंपळवंडी ते भटकळवाडी रोडवर सापळा रचून गाडी क्र :- (एम एच १४जेयु ८४९८) या गाडीतून अवैद्य दारू साठा जप्त केला तसेच कारचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहॆ अक्षय बाबाजी लांडगे (रा. सावरगाव )असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहॆ .ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक यशवंत नलावडे , सहायक निरीक्षक सुनिल बडगुजर ,विनोद गायकवाड ,पंकज पारखे ,हनुमंत ढोबळे ,सचिन रहाणे ,केशव कोरडे यांनी केली .