

चाकण
चाकण येथील कला शिक्षिका सौ.निता सुशील शेवकरी यांच्या आर्ट वर्ल्ड ड्रॉइंग क्लास ला शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी क्लास च्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांची पाहणी करून कला क्षेत्रात असलेल्या विविध संधींची माहिती घेऊन विद्यार्थी आणि शिक्षिका सौ.शेवकरी यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘यशस्वी भव’ असे म्हणत
~~~
खेड तालुक्यातील तन्वी योगेश वाघुले आणि अंकिता भरकड या मुलीने माझे हुबेहूब रेखाटलेले चित्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला व मी आनंदाने भारावून गेलो.
तनवीने व अंकिताने अतिशय सुबक व सुंदर पध्दतीने रेखाटलेल्या माझ्या फोटोची फ्रेम मला भेट म्हणून दिली. तिच्यातील कलागुणांचे कौतुक करून ‘यशस्वी भव’ अशी पाठीवर कौतुकाची थाप दिली..
आपल्या या भागामध्ये विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणारे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी असून त्यांच्यातील कलेला वाव मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच तन्वीला व अंकिताला शुभेच्छा देताना भविष्यात तुम्हाला यशाचे शिखर गाठताना कुठे काही सहकार्य लागल्यास मी नक्कीच उभा राहील अशी आश्वासक शाबासकी दिली. गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या आर्ट वर्ल्ड ड्रॉईंग क्लासेस चे देखील यानिमित्ताने अभिनंदन करतो.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, मा.नगरसेवक महेश शेवकरी, रोनक गोरे, बिपीन रासकर, रत्नेश शेवकरी, सुशील शेवकरी, ऋषिकेश शेवकरी, गणेश गोरे, स्पर्श हाईट्स सोसायटीचे सभासद उपस्थित होते.