
सुदर्शन मंडले
तालुका प्रतिनिधी जुन्नर
मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये सराटी या गावी मनोज जरांगे हे सामाजिक कार्यकर्ते शासनाने मराठा आरक्षण अध्यादेश काढून जाहीर करावे या मागणीसाठी उपोषणास बसलेले आहेत त्यामुळे शासनाने हे उपोषण मोडीत काढण्यासाठी मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर अमानुष असा लाठीमार केला त्यामध्ये वृद्ध व्यक्ती लहान मुले महिला आणि तरुण हे गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि उपोषण करते मनोज जरांगे यांना उपोषणास पाठिंबा देण्यासाठी, तसेच शासनाने मराठा आरक्षण अध्यादेश काढून जाहीर करावे या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे त्याला ओतूर मधील सर्व नागरिकांनी व सर्व व्यापारी बांधवांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून उस्फूर्त पाठिंबा दिला आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल शेठ तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ ढमाले,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद जी पानसरे,सामाजिक कार्यकर्ते दशरथ भिमाजी डुंबरे पाटील, राजू शेटे, माझी पंचायत समिती सदस्य रामदास शेठ तांबे, व्यापारी सुनील शेठ चांदवडकर, सुनील शेठ खामकर, माजी सरपंच दिलीप शेठ डुंबरे, सामाजिक कार्यकर्ते बबन गाढवे, उद्योजक जालिंदर शेठ पानसरे, आबा काशीद रजाक भाई इनामदार व गावातील विविध संघटनांचे,पक्षाचे नेते कार्यकर्ते हजर होते यावेळी एपीआय माननीय सचिन कांडगे साहेब तसेच मंडलाधिकारी हलके साहेब हजर होते त्यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेठ मनाजी तांबे शासन प्रशासन यांना निवेदन देण्यात आले माननीय मोहित ल शेठ ढमाले, बबनराव गाढवे आणि दिलीप शेठ डुंबरे आणि इतर नेत्यांची पाठिंब्यासाठी भाषणे झाली शंभर टक्के दुकाने बंद ठेवून धिक्कार केला आणि आपला निषेध नोंदवला