सस्नेह निमंत्रण…भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (उत्तर) च्या नुतन कार्यालयाचा शुभारंभ व जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा शनिवारी (ता. ९) संपन्न होणार…*

Spread the love

भाजपा पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष मा.शरदभाऊ बुट्टे-पाटील यांनी गतिमान आणि हायटेक कारभारासाठी सुसज्ज कार्यालयाची निर्मिती.. *भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा (उत्तर) अध्यक्ष शरदभाऊ बुट्टेपाटील* यांच्या संकल्पनेतुन साकारत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नुतन जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ येत्या *शनिवारी (ता. ९)* पुणे-नाशिक रोड लगत संतोषनगर भाम ता.खेड येथे पुणे जिल्ह्याचे *पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील* यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा सोहळा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक मा.श्री.बाळाभाऊ भेगडे, भोसरीचे आमदार तथा शिरुर लोकसभा प्रमुख मा.श्री महेशदादा लांडगे, दौंडचे आमदार तथा पुणे जिल्हा समन्वयक ॲड.राहुलदादा कुल, प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा प्रभारी मा. श्री. राजेशजी पांडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. गणेशतात्या भेगडे व सर्व विधानसभा निवडणुक प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष शरद भाऊ बु्ट्टेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली *पुणे जिल्हा ग्रामीण (उत्तर) नुतन जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही संपन्न होणार आहे.* भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा (उत्तर) अध्यक्ष शरदभाऊ बुट्टेपाटील यांच्या संकल्पनेतुन साकारत असलेल्या वरील कार्यालयामुळे पुणे जिल्हा भाजपाचा कारभारही अतिशय गतिमान होणार असुन भारतीय जनता पक्षाचे विचार व केंद्र तसेच राज्य सरकारची विधायक कामे तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी पुणे जिल्हा भाजपाची सर्व टीम कार्यरत राहणार आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांसोबतच जिल्ह्यातील सर्व जनतेचे तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकार्‍यांच्याही नजरा येत्या शनिवारी भाम, ता.खेड येथे होत असलेल्या भाजपाच्या कार्यक्रमाकडे लागलेल्या आहेत. आपल्या सर्वांची उपस्थिती प्राथनिय आहे. – *जनार्दन दांडगे (संयोजक- भारतीय जनता पार्टी सोशल मिडीया, पुणे (जिल्हा).*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents