
पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपूनछपून होणारा अमली पदार्थ, ड्रग्स विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो यांनी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री बाळासाहेब कोपनर सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे दि. ०४/०९/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील वपोनि श्री संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार असे सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अंमलदार प्रदीप शेलार व मितेश यादव यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मते यांची मिळकत, कांतीलाल साठे यांचे चाळीच्या मागे वाकवस्ती, स.नं.६६/५/४ पिंपळे निलख पुणे येथे मोकळ्या जागेत एका इसमाने गांजा विक्रीसाठी गांज्याची झाडे लावली आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरुन आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी इसम नामे धानेश अनिरुध्द शर्मा वय ३४ वर्षे रा. विक्रांत टकले यांचे रुममध्ये वाकवस्ती स.नं.६६/५/४ पिंपळे निलख पुणे मुळगाव कोहरालिया पो मुसहरीबानार जिल्हा गोपालगंज राज्य बिहार यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन त्याने लावलेली एकुण १.९६,९३०/- रु. किं.ची एकुण १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली आहेत. सदर इसमांविरुध्द विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये ०१ आरोपी अटक करुन त्यांचेकडुन एकुण १,९६,९३० /- रु. १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली आहेत. किं.ची एकुण
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे साो, मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार, सपोफी बाळासाहेब सूर्यवंशी, प्रदिप शेलार, पोलीस हवा. राजेंद्र बांबळे, पो.ना. संतोष भालेराव, पो. शि. मितेश यादव, पो.शि. सदानंद रुद्राक्षे, पो.शि.. अशोक गारगोटे, पो.शि. कपिलेश इगवे व पो.शि. पांडुरंग फुंदे यांनी केली आहे.
( स्वप्ना गोरे)
पोलीस उप आयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड