
प्रतिनिधी संतोष टाकळकर
खेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा यांचे एक ऑक्टोबर पासून 24 ऑक्टोबर पर्यंत साखळी उपोषण सुरू 25 तारखेला एमआयडीसी बंद पुकारली होती. व 25 तारखेपासून आमरण उपोषण सुरू झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खेड तालुका माजी सभापती श्री अंकुश शेठ राक्षे,मनोहर जी वाडेकर ,विकास ठाकूर, व अजय स्वामी यांनी जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे सांगितले. सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या शेजारी असलेला खेड तालुका यामध्ये एक तारखेपासून सकाळी पोषण सुरू आहे व आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे या एक महिन्यांमध्ये दिलीप वळसे पाटील एकदाही भेट देण्यास आले नाहीत. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर खेड तालुक्यांमध्ये लागले होते. रात्री मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी टोल नाक्यावरील सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या बॅनरला काळे फासून जाहीर निषेध नोंदवला.
