
प्रतिनिधी संतोष टाकळकर
खेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा सकल माराठा समाज खेड तालुका यांचे 26 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. एक तारखेपासून चाललेले साखळी उपोषण व आता आमरण उपोषण तरीही या ठिकाणी सरकारचे कोणीही भेटण्यास आले नाही व आरक्षण वरती ही काही निर्णय नाही.या उपोषण दरम्यान एका उपोषणकरत्याची प्रकृती बिघडली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खेड तालुका सभापती श्री अंकुश शेठ राक्षे,श्री मनोहर जी वाडेकर ,श्री विकास ठाकूर, व श्री अजय स्वामी यांनी जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे सांगितले.
