
प्रतिनिधी संतोष टाकळकर
मराठा सोयरीक संस्थेचा ७९ वा पहिला मोफत वधु वर परिचय मेळावा प्रचंड गर्दीत राजगुरुनगरच्या मार्केट कमिटी हॉलमध्ये पार पडला.
सोमवार दिनांक 27/11 /2023 रोजी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने राजगुरुनगर येथे वधू वर मेळावा पार पडला. सकाळी अकरा वाजता प्रतिमेचे पूजन करून मेळाव्यास सुरुवात झाली. या मेळाव्यात खेड तालुक्यातील व परिसरातील ५५० वधू-वरांनी भेट दिली.
५५० पैकी ४५० मुले व १०० मुली अशी नोंदणी झाली .
या मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास शेठ लिंभोरे ,जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे, सभापती अंकुश भाऊ राक्षे, मनोहर वाडेकर,निलेश आंधळे,निवृत्ती नाईकरे,दिलीप होले, सुदाम कराळेएडवोकेट अनिल शेठ राक्षे, नगरसेवक शंकर राक्षे, ग्रामपंचायत सदस्य वेताळे कविताताई बोंबले, जिल्हा सदस्य बचत गट शांताराम नेहेरे ,युवा कार्यकर्ते शुभम बालघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती मध्ये मराठा सोयारिक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे ,संचालक प्रमोद झावरे ,महेंद्र गाडे सर, ग्रामपंचायत सदस्य वेताळे कविता बोंबले, कांतिराम बोऱ्हाडे,मनोज मराठे हे होते.
व्यवस्थापक पूजा पवार निकिता रोकडे यांनी परिश्रम घेतले.
पुढील मेळावा रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी चिंचवड येथे होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी ७०२०२८१२८२ या नंबर वर संपर्क करावा.