गुन्हे शाखा, युनिट 3 कडील पो हवा 1456 भोसूरे, पो शि 1940 हणमंते , पोशिं 2001 नांगरे पोशिं 2273 दांगट असे Mhalunge MIDC पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना * पो शि 2001 नागरे व पो.शि.1940 हणमंते यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कुरूलिं येथे पुणे नाशिक हायवे रोड लगत हॉटेल महाराजा येथे एक इसम पिस्तुल बाळगून उभा आहे त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून सदर इसमास पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आकाश विजय कुरवरे वय 25 वर्ष राहणार लक्ष्मी नगर मोशी पुणे असे सांगितले सदर इसमाची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याचे जवळ असणारे पिशवीमध्ये दोन देशी बनावटीचे *पिस्तूल * असे किंमत रु 1,00,000/- चा मुद्देमाल मिळून आला सदर इसमा विरुध्द Mhalunge midc पोलीस स्टेशन गु.र.नं. 780/2023 येथे आर्म ॲक्ट कलम 3,25 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
आरोपी वरील दाखल गुन्हे
1) भोसरी midc 344/18 भा.द.वि. कलम 376 पोसको कलम 3,4 5
2) चाकण 814 /2021 म.दारू बंदी अधिनियम 65 [ इ]
3) चाकण/2021 भा.दं. वि.कलम 392, 3
गुन्हे शाखा युनिट 3
पिंपरी चिंचवड आयुक्तालय
