
प्रतिनिधी संतोष टाकळकर
काल २९/११/२०२३ रोजी वडगांव पाटोळे येथे काल्याचे किर्तन सोहळा पार पडला.
या सोहळ्यासाठी वडगाव पाटोळे गावातील बहुसंख्य भावीक उपस्थित होते. किर्तनात गावातील बहुसंख्य महिलांनी टाळकरी म्हणून सहभाग घेतला.ह भ प बाळशीराम महाराज मिंडे यांची कीर्तन सेवा झाली. मिंडे महाराजांनी अतिशय मार्मिक व सुंदर कीर्तन अनेक दाखले देऊन केले. या कीर्तनात मिंडे महाराजांनी कृष्ण महिमा, कृष्ण जल्म सांगत असताना भाविक अगदी तल्लीन होऊन गेले.या सोहळ्याचा शाळेतील मुलांनी देखील आनंद घेतला. शेवटी विनेकर्याने दहीहंडी फोडल्यानंतर पांडुरंगाची आरती घेऊन सांगता करण्यात आली.
या सोहळ्यासाठी गावातील सर्व गावकरी,तरुण कार्यकर्ते व महिला भगिनींनी सहभाग घेतला.
आयोजक:समस्त ग्रामस्थ वडगांव पाटोळे व श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ.