
चाकण-तळेगाव रस्त्याची रोजचीच नित्याची वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होत असताना. पहाटे २ च्या सुमारास गगनगिरी दूध संघाचा दुधाने भरलेला टँकर खराबवाडी गावातील महादेवी मंदीरा जवळील नाल्यात गेला. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे टँकर बरोबर ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉलीही त्या खाली दबल्याचे या विचित्र अपघाताची परिसरात चर्चा होत आहे.
Vo : हा टँकर दुधाने भरलेला असल्याने टँकर नाल्यातून काढण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. घटनास्थळी महाळुंगे वाहतूक व महाळुंगे MIDC पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. टँकर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व वाहतूक विभाग यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
प्रतिनिधी.
अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 चाकण, पुणे