

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर ) येथील स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग येथे दत्त जयंती च्या निम्मिताने धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्रापूर तळेगाव राऊतवाडी तसेच कासारी या गावातुन तब्बल दोन हजार पेक्षा जास्त सेवेकरी गुरुचरित्र पारायण ला बसले आहे.शिक्रापूर येथे दत्त जयंती च्या निम्मिताने श्री गुरुचरित्र, प्रहर,मान, जप, यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे. या मध्ये तरुण युवक, युवती, आणि महिलांचा सर्वात जास्त समावेश आहे.पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, जिजामाता बँक चे संचालक आबाराजे मांढरे, गंगाधर पठाडे, अमर करंजे, गौतम गव्हाणे, स्वप्नील शिंदे, विठ्ठल वाघमारे ,आधी सेवेकरी याबाबत चे उत्तम नियोजन करीत आहे.सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र यांच्या वतीने गुरुचरित्र भेट देण्यात येणार आहे. येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमामुळे परिसर भक्तीमय झाला असल्याचे दिसुन येत आहे.कु.सचिन दगडेशिरूर तालुका प्रतिनिधी8767358432