
पुणे पिंपरी चिंचवड .. प्रतिनिधी लहू लांडे
नववर्षाच्या स्वागतार्थ बरेच नागरिक घराबाहेर पडून मध्यरात्रीपर्यंत पायांचे आयोजन करत असतात. बऱ्याचदा नागरिक नशा करुन वाहन चालवून स्वतःचे तसेच इतरांचे जीवास धोका निर्माण करत असतात. या सर्व बाबींना प्रतिचंध करण्याच्या दृष्टीने उद्या ३१ डिसेंबरच्या रात्री पिंपरी चिंचवड पोलीसांचे वतीने ३० ठिकाणी कडेकोट नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.
नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकाची कसून चौकशी करण्यात येणार असुन ब्रेथ अॅनालायझर मशीनच्या साहाय्याने श्वासाचे नमुने तपासण्यात येणार आहेत. दारु पिवून वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांचे वाहन अटकावून ठेवण्यात येणार आहे.
कोणीही नशा करुन अथवा धोकादायकरीत्या वाहन चालवू नये. तसेच नववर्षाचे स्वागत उत्साहाने परंतु शांतपणाने, कायद्याचे पालन करुनच करावे व शांतता राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीसांचे वतीने करण्यात येत आहे.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा…!
(1212023. (बापू बांगर) पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड शहर