प्रतिनिध संपादक.लहू लांडे
आज अंतरवाली सराटी येथे मुंबई आंदोलनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून मुंबईच्या निकराच्या लढाईनंतर विजय सभा घेण्याचा मनोदय संघर्षयोद्धा मनोज पाटील यांनी व्यक्त केला. आपल्याला देखील आपल्या तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून आपापली शिदोरी बांधून, आपापली वाहने घेऊन मुंबईच्या दिशेने निघायचे आहे. याबाबतची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून मराठा क्रांती मोर्चा, खेड तालुका व सकल समाज खेड तालुका यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी केले आहे.
