


प्रतिनिधी संपादक लहू लांडे
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी “एक वही एक पेन” या संकल्पने अंतर्गत संघटनेवर विश्वास ठेऊन जनतेने भर भरून प्रतिसाद दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप खेड तालुक्यातील श्री सुमंत विद्यालय पिंपरी बु ll येथे शिक्षण घेत असलेल्या वडगाव, रोहकल,शिरोली,चांदूस, कोरेगाव व पिंपरी खुर्द या गावांतील गरजू विद्यार्थ्यांना बुधवार दि.03 जाने.2023 रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मा.हरेशभाई देखणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.शिरोली गावच्या उपसरपंच पदी मा.संजय एकनाथ सावंत यांची निवड झाल्या बद्दल सुंमत महाविद्यालय संस्थेचे सचिव श्री. कैलासराव ठाकुर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अलका जोगदंड यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई यांचा त्याग तसेच शिक्षणाविषयी चे कार्य समजून सांगितले.शिरोली गावच्या पोलीस पाटील निर्मला देखणे ह्या म्हणाल्या कि ,सावित्रीमाई मुळेच सर्व महिलां आज प्रगतीपथावर आहेत.त्यांचा त्याग व आदर्श विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवा.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती साधयची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही उपसरपंच संजय सावंत ह्यांनी संबोधित केले.सदर कार्यक्रम सुंमत महाविद्यालयाचे सचिव कैलासराव ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.हरेशभाई देखणे,महा.उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख प्रमोद खोब्रागडे, महा राज्य.सचिव संदीपभाऊ साळुंखे,जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड,सुमंत विद्यालयाचे सचिव कैलासराव ठाकुर,सामाजिक कार्यकर्त्या अलका जोगदंड, पिंपरी बु!गावच्या सरपंच मोनालीताई ठाकुर,शिरोली गावचे उपसरपंच संजय एकनाथ सावंत,पोलीस पाटील निर्मला देखणे,सामाजिक कार्यकर्ते निलेश ठाकुर,खेड ता.सरचिटणीस इमरान शेख,उपाध्यक्ष सत्यवान शिंदे,चाकण शहर महिला कार्याध्यक्ष ज्योती गवालवाड तसेच सुंमत महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक व मोठ्या संखेने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.