


प्रतिनिधी संपादक लहू लांडे
महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या सी सी टि व्ही फुटेजची पाहणी करुन स्कुटीच्या व्हिलचे रंगाच्या आधारे आवळल्या मुसक्या त्यांचेकडुन २९,०३,४००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्तश्री नितीन शहाजी कर्षे वय ३४ वर्ष, धंदा शेती, व्यापार व क्रेशरप्लॅन्ट रा. मोई, इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, मोई निघोजे रोड लगत ता. खेड जि. पुणे यांनी दि.२५/१२/२०२३ रोजी १७.०० वाजता ते २१.४५ वाजताचे दरम्यान मौजे मोई गावचे हद्दीत, इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, मोई निघोजे रोड लगत ता. खेड जि. पुणे येथे फिर्यादीचे राहते घराचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाठीमागील बाजुने जिन्या जवळील खिडकीचे लोखंडी ग्रिलचे बार कशाने तरी कापुन त्यावाटे आत प्रवेश करुन आतील सहा बेडरुम मधील वेगवेगळी लाकडी कपाटे कशाचे तरी सहयाने उचकटुन त्यातील सोन्याचे दागिणे एकुण ४७.८ तोळे वजनाचे त्यात सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट कडे व रोख रक्कम ५,१५,०००/- लाख रुपये असा एकुण (तीस लाख अड्डेचाळीस हजार चारशे रुपये) अक्षरी ३०,४८,४००/- रुपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला म्हणुन तक्रार दिल्याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८६५/२०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० अन्वये अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हा हा घर फोडी सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असुन सदरबाबत मा. पोलीस आयुक्त सेा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलाय यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना सीसीटीव्ही, तांत्रिक गोष्टी व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.दाखल गुन्हयाचे तपासामध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी मा. वरीष्ठांच्या सुचना व आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केल्यावर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील सी सी टि व्ही फुटेज सलग ९ दिवस पाहणी करीत असताना एक इसम लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर संशयित रित्या येवुन बंगल्याची रेकी करत असल्याचे दिसुन आले. त्याअनुशंगाने मौजे मोई, कुरुळी, चिंबळी फाटा येथील सीसीटिव्ही फुटेज पाहत असताना चिंबळी फाटा ते कुरुळी गावाकडे जाणारे रोडवर डोंगरवस्ती येथे एक इसम लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर दिनांक ०२/०१/२०२४ रोजी २१/१५ वाजताचे दरम्यान संशयित रित्या फिरत असताना आढळुन आल्याने त्यास तपास पथकातील अंमलदार यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो स्कुटी घेवुन पळुन जावु लागल्याने त्यास शिताफीने पाठलाग करुन पकडुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले त्याचेकडुन सोने, रोख रक्कम व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.अ पोलीस ठाणे महाळुंगे गु.र.नं. व कलमएकुण जप्त माल ४७.८ तोळे वजनाचे सोने त्यात सोन्याचे किंमत८६५/२०२३ भा.द.वि.क. ४५७, ३८०गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, रुपये अंगठया कानातील कर्णफुले जोड,२९,०३,४००/-बांगडया, बेसलेट कडे व रोख रक्कमअटक आरोपींचे नाव :-३,००,०००/- लाख रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल१) आमिर शब्बीर शेख, वय २५ वर्षे, रा. सध्याचा पत्ता सेक्टर २५, निगडी प्राधिकरण, ता. हवेली जि. पुणे मुळगाव वडेश्वर काटे, वडगाव मावळ, पुणे यास अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली बरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पोकों/ शिवाजी लोखंडे, चाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रदिप गायकवाड, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
