शिवसेनेचे चाकण शहराचे माजी शहरप्रमुख अक्षय जाधव यांच्या जनसंपर्क संपर्क कार्यालयाचे उदघाटन बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती चे औचित्य साधून

Spread the love

प्रतिनिधी संपादक लहू लांडे

शिवसेनेचे चाकण शहराचे माजी शहरप्रमुख अक्षय जाधव यांच्या जनसंपर्क संपर्क कार्यालयाचे उदघाटन बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती चे औचित्य साधून मंगळवार(दि.-२३) रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. या उदघाटनाला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.अक्षय जाधव यांचा शहरातील सर्व घटकांतील नागरिकांच्यातील बरोबरचा जनसंपर्क बघता त्यांचे यापुढे राजकीय जीवन अतिशय उज्ज्वल असल्याचे उपस्थित एसआरव्ही पक्षीय नेते व स्थानिक नागरिक बोलून दाखवत होते. अक्षय जाधव यांच्या कामाची पद्धत बघता ते सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची शहरात वेगळी ओळख आहे. आता जनसंपर्क कार्यालय सुरू करून शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी व त्यांना निर्माण होणार्‍या कागदपत्राच्या अडचणी यापुढे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे अक्षय जाधव यांनी नागरिकांना आश्वाशीत केले आहे.या उदघाटनाच्या निमित्ताने अक्षय जाधव यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समिति सदस्य भगवान पोखरकर यांच्या निधीतून चाकण शहरातील रस्ते, लाईट, शाळा, छोटे मोठी विकास कामांचा बॅकलोग शहरात भरून काढणार असल्याचेही अक्षय जाधव यांनी सांगितले. यावेळी अक्षय जाधव यांनी चाकण शहरासाठी मी आमचे नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व भगवान पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तास उपलब्ध राहून चाकणच्या विकासाचे उदिष्ट पूर्ण करणार असल्याचेही ग्वाही दिली. यावेळी उपस्थित असणारे सर्व पक्षीय नेत्यांनी अक्षय आम्ही तुमच्या बरोबर आहोत चाकणचा विकास होत असेल तर नक्की तुम्हाला आमची साथ राहील असेही आश्वाशीत केल्याने नक्कीच भविष्यात अक्षय जाधव यांचे राजकीय भविष्य चाकण विकासासाठी अनमोल ठरेल यात तिल मात्र शंका नाही.यावेळी बोलताना अक्षय जाधव यांचे चुलते रामदास जाधव यांनी आम्ही चाकण वाशियांचे काही तरी देणे लागतो म्हणून अक्षय माझा पुतण्या या नात्याने अक्षय यांना मी चाकणकर जनतेच्या स्वाधीन करतो तो तुमचा सर्वांचा विश्वासाला तडा जाऊन देणार नाही याचिमला खात्री आहे. अशी भावना व्यक्त केली. त्याच बरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी अक्षय जाधव यांना कोणत्याही प्रशाकीय व राजकीय जीवनात काही मदत लागूदेत ती आम्ही करायला तत्पर आहोत असा शब्द दिला. हिंदू ऋदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना सर्व उपस्थित मान्यवरांच्याकडून अभिवादन करण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमाला चाकण शहरातील तरुण कार्यकर्ते, जेष्ठ मार्गदर्शक नागरिक, सर्व पक्षीय नेते यांच्यासह शहरातील व खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents