


प्रतिनिधी संपादक लहू लांडेअथर्व नेत्र रुग्णालय नारायणगाव येथील डॉक्टरांनी गरजू लोकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी तीनशे ते चारशे च्या आसपास तपासणी करण्यात आली.खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला नेताजी सुभाष चंद्र बोस स्वातंत्र्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे होते आजाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व क्रांतिकारकांमध्ये त्यांचे योगदान वर महत्वाची मानले जाते. असे स्पष्ट मत आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले. राजगुरुनगर शहरातील एसटी स्टँड जवळ सुभाष चंद्र बोस प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सुभाष चंद्र बोस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक दुगड. अध्यक्ष किसन लोणकर ,सुरेश पालीवाल ,चंद्रकांत साबळे. हिरामण सातकर . र वींद्र गुजराती, रंगनाथ सुतार, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अतुल देशमुख, सागर सातकर. माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर. अनिल शेठ कहाने,जी. र .शिदे, संतोष गाडेकर , बाळासाहेब सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायकराव घुमटकर, सिद्धार्थ कहाने, महिला प्रतिनिधी शिवसेना विजयताई शिंदे, सुदाम कराळे, एल.बी .तनपुरे, याच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला . सुभाष चंद्र बोस जयंती वेळी नेत्र रुग्ण तपासणी डॉक्टर चेतन कोळी ,आमदार मा दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . राजगुरुनगर शहरातील पुना नाशिक हावे वरील भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव , डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले .सर्व सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी नगरसेवक ,जिल्हा परिषद सदस्य, राजगुरुनगर शहर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य , प. समिती सदस्य , खेड ,राक्षेवाडी सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुभाष चंद्र बोस प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .