


चाकण शहरातील जिल्हा परिषद शाळा क्र-०२ (मुलींची) या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रम ची सूत्रसंचलन कोमल माने मॅडम व कारपे प्रतिनिधी रेश्मा ढावरे यांनी केले व उपस्थित सर्वांचे स्वागत केले सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावंडे मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुण सरस्वती मातेच्या मुर्तीला हार अर्पन करुण पुजा करण्यात आली.आलेल्या सर्व माण्यवरांचे व उपस्थितांचे शालेय विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.त्यानंतर हळदी कुंकूच्या निमित्ताने सर्व महिला कर्मचारी, नगर परिषदेच्या महिला वर्ग यांनी विविध खेळामध्ये सहभाग नोंदवला तसेच शहरामध्ये ओल्या कचऱ्यापासून उत्तम प्रकारे कंपोस्ट खत निर्मिती करणाऱ्या नागरिकांमधुन पहिले तीन नंबर काढुन त्यांना नगरपरिषद उप मुख्याधिकारी सुनील गोरडे व टेनेको कंपनीचे एच आर अभिषेक करवंदे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.*प्रथम क्रमांक – पल्लवी पानसरे**द्वीतीय क्रमांक- जूगूणा परदेशी**तृतीय क्रमांक – प्रभाकर निघोजकर* उर्वरीत कंपोस्ट खत निर्मिती करणाऱ्या नागरीकांना प्रमाणपत्र देत “पर्यावरण दुत” म्हणुण त्यांचा सन्माण करण्यात आला.नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी श्री सुनिल गोरडे सर व टेनेको ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. चे अभिषेक करवंदे सर यांनी आपले मनोगत मांडताना नागरिकांना पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन तर करावेच परंतु आपण करत असलेले कार्य इतरांनाही सांगूण असेच पुढे न्यावे याबाबत सदिच्छा दिल्या.सर्व महिलांनी कार्यक्रमांमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला होता सर्वांनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला. सर्वांना चहा नाश्ता व संक्रातीचे वाण म्हणुण तुळशीचे रोपे दिली महिलांनी एकमेकींना हळदी कुंकवाचा मान देऊन व तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे शाळेतील मुख्याध्यापिका पवार मॅडम, शाळेतील शिक्षक वृंद तसेच नगरपरिषदेच्या विद्युत अभियंता कोमल माने ,मेघा वाबळे,आरती पाटील,स्नेहल गोरे,स्वाती बिरादार,कीर्ती गुरव,हर्षदा इंदोरे,सुरेखा गोरे,प्रियांका राउत,नगरपरिषद च्या महिला सुपरवायझर मंगल गायकवाड ,महिला कर्मचारी, तसेच करपे प्रतिनीधी रेश्मा ढावरे, विद्या आचारी, शिवाजी दामोदरे उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे
बातमी सर्वसामान्यांची संपर्कासाठी संपर्क क्रमांक 9766694886