


श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व नेहरू बालक मंदिर या प्रशालेमध्ये बालवर्ग प्ले ग्रुप ते मोठा गट या बालवर्ग गटातील विद्यार्थ्यांचा बोरन्हाण कार्यक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला बोरन्हाणसंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये, यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. नेहरू बालक मंदिर प्रशालेचे चिमुकले विद्यार्थी मकर संक्रांतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून प्रशालेत हजर होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी कोळी यांच्या हस्ते बोरन्हाण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले पारंपारिक पद्धतीने प्रशालेमध्ये बोरन्हाण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी नेहरू बालक मंदिर प्रशालेच्या भांडवलकर मॅडम देशमुख मॅडम भगत मॅडम कोरगावकर मॅडम ढेंबे मॅडम उपस्थित होत्या* प्रतिनिधी संपादक लहू लांडे बातमी सर्वसामान्यांचे पाहण्यासाठी संपर्क क्रमांक 9766694886