

प्रतिनिधी संपादक लहुजी लांडे
बातम्यासाठी संपर्क क्रमांक 9766694886 नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा आणि बातम्या बघा
26 जानेवारी निमित्ताने खेड तालुक्यातील आदिवासी खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहरे, धामणगाव, गोरेगाव बांगरवाडी ,माजगाव सरकुंडी, इत्यादी शाळांमधील शंभर शालेय विद्यार्थ्यांना बुटाच्या वाटप करण्यात आले. संस्थेचा हा उपक्रम नववर्षापासून हव्यातपणे सुरू असून आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून बुटाचे वाटप करण्यात आले आहे…आदिवासी बहुल भागातील शालेय विद्यार्थ्यांना परस्थिती अभावी अनवाणी पायाने शाळेत जायला लागू नये म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे…यावेळी मुख्याध्यापक आनंदा मुऱ्हे यांनी स्वागत केले तर शिक्षक रामचंद्र तळपे, शंकर भागीत, मोनिका नाटे, लालू करवंदे यांनी प्रास्ताविक केले यावेळी संस्थेचे संस्थापक जीवन लेंडघर सचिव ॲड.मनोज जंबुकर,उपाध्यक्ष सुरेश जाधव, डॉ. पंचाक्षरी पुजारी, अप्पा धाडगे ,तेजस धाडगे , पंढरी भाईक, राजू कुमिटकर तसेच संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच विठ्ठल गवारी यांनी आभार व्यक्त केले