

संपादक लहूजी लांडेखेड तालुक्यातील रेटवडी येथील स्वामी समर्थ मंदिर (मठ) प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध सा स्कृतिक कार्यक्रम करून स्मपंन झाला. सकाळी ७ते९ श्री ची महापूजा आरती झाली.दुपारी ४ते५.३०पर्यंत संगीत भजन कार्यक्रम संपन्न झाला.५.३०ते ६.३० रेटवडी आणि परिसरात भव्य दिव्य अशी श्री च्या पादुका , पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६.३० श्री ची महाआरती झाली. सर्वत शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सद्गुरू विजय महाराज, यांचे सुश्राव्य असे प्रवचन झाले. यावेळी खेड तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय रेटवडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी , मान्यवर आणि ग्रामस्थ , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व स्वामी भाविक भक्तांनी स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात आनंद लुटला. या पालखी सोहळा स्वामी समर्थ मठ अध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक शरदकाका वाबळे पाटील यांनी केले