


संपादक लहूजी लांडे
सिताई इंटरनॅशनल स्कूल चाकण पुणे येथे मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन पार पाडला. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळण्याचे उत्तम व्यासपीठ. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच स्नेहसंमेलनना मध्ये मनापासून व आनंदाने भाग घेतला पाहिजे कारण विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळण्याचे हे व्यासपीठ म्हणजेच स्नेहसंमेलन होय. यावर्षी सिताई इंटरनॅशनल स्कूलचे बालचमुंचे यांनी अतिशय आकर्षक वेशभूषांनी सजलेले तसेच विद्यार्थ्यांनी नाविन्यतेने नटलेले विविध असे सामाजिक संदेश आपल्या देहबोलीतून त्यांनी सादरीकरण केलेले आहे. तसेच पालक वर्ग देखील अतिशय उत्साहाने या स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झालेला होता. सर्वजन उपस्थित राहिल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे आभार मानले .सविस्तर माहिती ** चाकण ,पुणे येथील- सिताई इंटरनॅशनल स्कूल प्री-प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन २) या कार्यक्रमाचे उदघाटन- चक्रेश्वर महिला सहकारी संस्था चे चेअरमन खजिनदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ३)कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्रमुख अतिथी तसेच शाळेचे डायरेक्टर यांच्या हस्ते झाले.४)किरण दत्तात्रय बनसोडे(डायरेक्टर) यांनी स्वागत पर भाषण करून सर्वांचे स्वागत केले.५)प्रतिमा गणपत सोनटक्के (डायरेक्टर) यांनी शाळेबद्दल सविस्तर माहिती तसेच शाळेचे व्हिजन अँड मिशन बद्दल माहिती देण्यात आली. ६) चक्रेश्वर महिला सहकारी संस्था चे चेअरमन लताताई ज्ञानोबा घुमटकर व खजिनदार. सविता गणेश शेवकरी यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.७) यावेळी प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर (के.जी),सीनिअर(के.जी) च्या विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे भन्नाट व अफलातून अशा विविध गीतांवर, विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटात विविध नृत्ये सादर केली. यात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटीका या कार्यक्रमांचा समावेश होता.यामधे पालकांनी देखील समूह नृत्य करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.८) शाळेतर्फे घेण्यात आलेल्या पालकाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा याचे बक्षीस वितरण करण्यात आले.९)तर सूत्रसंचालन पोखरकर मॅडम यांनी केले. १०)आभार प्रदर्शन प्रतिमा गणपत सोनटक्के (डायरेक्टर)यांनी केले. ११)कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली
बातमी सर्वसामान्यांची पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप क्रमांक दोन फोटो आणि माहिती पाठवा आणि आमचा व्हाट्सअप क्रमांक तुमच्या सर्व ग्रुपला ॲड करा 9766694886/8007686970 या क्रमांक वरती माहिती सोडा