
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुकुल वसतिगृह कासारी येथे मुलांसाठी केले चटई वाटप.शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील कासारी फाटा येथील गुरुकुल वसतिगृहामधील मुलांना शिवसेनेच्या शिरूर तालुका कक्ष प्रमुख सौं.अनिता सासवडे यांनी 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिना निमित्त चटई वाटप करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.सौं. अनिता सासवडे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे ते शिरूर तालुक्यात चांगले परिचित आहे, ते नेहमी गोरगरिबांना, गरजूवंताना सढळ हाताने मदत करतात.गुरकुल वसतिगृहातील मुलांना चटई वाटप कार्यक्रम घेऊन गरजवंताना मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. त्यावेळी शिवसेना शाखा प्रमुख शिक्रापूर साधना शिंदे, सुरेखा दरवडे, छाया सकट, शीतल बनसोडे, राणी पखाले, गुरुकुल वसतिगृहच्या संचालिका शिंदे ताई, संतोष शिंदे, गजानन इंगळे, यांच्या सह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.कु.सचिन दगडेपत्रकार शिरूर तालुका