विद्या भवन हायस्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरादिनांक 26 जाने 20 24

Spread the love

प्रतिनिधी संतोष गाडेकर राजगुरुनगर

1जानेवारी ते 15जानेवारी 2024 सर्वत्र वाहतूक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. पिंपरी चिंचवड RTO अंतर्गत वाहतूक नियमाविषयी जनजागृती करण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन विद्यानंद भवन हायस्कूल येथे करण्यात आले होते. शालेय अभ्यासक्रमातील आर एस पी विषयावर आधारित उपक्रम शाळेत राबवण्यात येत आहेत. इ. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी वाहतूक सुरक्षा संदर्भात माहिती देण्यासाठी आर एस पी चे पिंपरी चिंचवड जिल्हा समादेशक श्री. लहू सुतार यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी स्लाईड शोच्या माध्यमातून वाहतूक नियम, रस्त्यावर घ्यायची काळजी, अपघात कसा टाळता येईल इत्यादी विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जगन सिरिल यांच्या भाषणाने झाले. आभार क्रीडा शिक्षक साहेबराव जाधव यांनी व्यक्त केले. या वेळी पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते बातमी सर्वसामान्यांची पाहण्यासाठी आमच्या मोबाईल नंबर से संपर्क साधा9766694886 आमच्या या नंबरला दोन फोटो आणि माहिती टाकू शकता आपली बातमी बघण्यासाठी या नंबरला आपल्या व्हाट्सअप ला व आपल्या ग्रुपला जॉईन करून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents