

प्रतिनिधी. लहुजी लांडे
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रमेश चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली.खेड तालुका पंचायत समिती येथे पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.खेड तालुक्यामध्ये एकूण ११ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६२ उपकेंद्र आहेत. यामध्ये एकूण ३८१ पोलिओ बूथ चे आयोजन करण्यात आले आहे. पल्स पोलिओ मोहीम 3 मार्च व यानंतर ५,६ व ७मार्च २०२४ रोजी गृह भेटीद्वारे एकूण ६०००० पेक्षा अधिक बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत.**खेड तालुक्यामधे ३ मार्च रोजी एकुण ५८०६८ एवढ्या बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली..**यावेळी एकुण ८३ पर्यवेक्षक यांनी याचे संनियंत्रण केले.एकुण ३८१ बुथचे नियोजन करण्यात आले होते.मोबाईल टीम १६ व बस स्टॅंड,टोल नाका ,महत्वाचे चौक यांठिकाणी १० ट्रांजिट टीम ठेवण्यात आल्या होत्या..**दि ५,६ व ७ मार्च रोजी गृहभेटी मधुन राहीलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे..***शून्य ते पाच वर्षे वयोगटातील आपल्या सर्व मुलांना पोलिओचा डोस आजच पाजून घ्या असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.***भारत जरी पोलिओमुक्त असला तरी शेजारी राष्ट्रांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने तो पुन्हा येऊ शकतो.आपल्या बालकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री करून घ्या आणि पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करा.***खेड तालुक्यामध्ये या मोहिमेमध्ये सर्वच लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.***