दिनांक २०/०५/२०२४ रोजीचे दुपारी १२:५१ वाजता कॉल प्राप्त झाला की, शाहुनगर एच. डी. एफ. सी कॉलनीचे पाठीमागे एका सोसायटीचे फ्लॅट मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असुन पोलीस मदत हवी आहे,

Spread the love

दि.२१/०५/२०२४”एमआयडीसी भोसरी पोलीसांनी अरण्यम सोसायटी, शाहुनगर चिंचवड येथील फ्लॅट मध्ये लागलेल्या आगीचे घटनेमध्ये वयोवृदध महिलेचे वाचविले प्राण”हकीगत :- दिनांक २०/०५/२०२४ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे कडील शाहूनगर बीट मार्शलवरील कर्तव्यार्थ असलेले पोलीस अंमलदार पोशि/२३४१ तानाजी दयानंद बनसोडे व पांशि/२३४० मच्छिद्र चितु टिके यांना डायल ११२ चे एम. डी. टी. वर दिनांक २०/०५/२०२४ रोजीचे दुपारी १२:५१ वाजता कॉल प्राप्त झाला की, शाहुनगर एच. डी. एफ. सी कॉलनीचे पाठीमागे एका सोसायटीचे फ्लॅट मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असुन पोलीस मदत हवी आहे, असा कॉल प्राप्त झालेनंतर पोशि/२३४१ तानाजी दयानंद बनसोडे व पोशि/२३४० मच्छिंद्र चिंतु टिके असे त्वरीत कॉल पाँईट ठिकाणी पोहचले असता अरण्यम सोसायटीचे बिल्डींगचे दुस-या मजल्यावरील एका फ्लॅट चे खिडक्यांमधून आगीचे लोट व धुर बाहेर येत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे पोशि/२३४१ बनसोडे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधुन फायर बिग्रेडची व अधिक पोलीस मदतीचे आवश्यकता असल्याचे कळविले व नमुद दोन्ही पोलीस अंमलदार यांनी प्रथमतः सोसायटी मध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅसचे जोडणी असलेले पाईप लाईन कनेक्शन बंद करुन घेतले व त्यानंतर सोसायटीचे बाहेर जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी त्यांना सांगितले सोसायटीचे आत मध्ये लोक आहेत. त्यामुळे पोशि/२३४१ तानाजी दयानंद बनसोडे यांनी त्यांचे सोबतचे पोशि/२३४० मच्छिंद्र चिंतु टिके यांना सोसायटीचे पार्किंग मधील गाड्या व विल्डींगचे खाली जमलेले लोक यांना गेटचे बाहेर काढण्यास सांगितले व ते स्वतः बिल्डींगचे जिन्याने आग लागलेल्या फ्लॅट मध्ये गेले. तेव्हा सदर फ्लॅट मध्ये पोशि/२३४१ बनसोडे यांना एक वयोवृदच महिला मदतीचे वाट पाहत असल्याचे मिळून आल्या असता त्यांनी सदर महिलेस खांदयावर उचलुन घेवुन बाहेर पडत असताच तेथे गैस सिलेंडरची टाकी त्यांना दिसुन आली. गॅस सिलेंडरचे टाकीमुळे स्फोट होवुन आणखी आग मोठया प्रमाणात भडकण्याची शक्यता असल्याने त्यांनी फ्लॅट मधील वृदध महिलेस खांदयावर घेवुन दुस-या हातात गॅस सिलेंडरची टाकी उचलुन घेवुन जिन्याने खाली येवुन पार्किंग मध्ये आणून सोडले.तेव्हा सोसायटीचे आवारात बिल्डींगमधील खाली आलेल्या रहिवाशी यांनी बिल्डींगमधील काही लोक हे आगीचे भितीने टेरेसवर गेल्याचे सांगितले तेव्हा पोशि/२३४९ बनसोडे यांनी तत्परतेने बिल्डींगचे दुस-या जिन्याने टेरेसवर जावुन तेथे थांबलेल्या रहिवाशांना सुखरुप पणे खाली आणून सोडले. बिल्डींगचे दुस-या मजल्यावरील फ्लॅट मध्ये लागलेल्या आगीचा लोट शेजारील फ्लॅट मध्ये जात असल्याने त्यास आग लागलेली होती व त्या फ्लॅट मध्येही दोन गॅसचे सिलेंडर असल्याची माहिती मिळाल्याने पोशि/२३४१ तानाजी बनसोडेयांनी अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे मदतीने सदरचे दोन्ही सिलेंडर जिन्याने खाली आणले त्यामुळे आग आणखी वाढण्याचा मोठा धोका टळला. तेवढयात सदर ठिकाणी पिंपरी चिंचवड मनपाचे अग्निशामक दलाचे गाडया पोहचल्या होत्या व पोलीस ठाणेकडील इतर अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन आम्ही स्वतः वपोनि गणेश जामदार असे पोहोचलो होतो. तसेच सदर ठिकाणी मा. डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पिंपरी चिंचवड यांनी स्वतः भेट देवुन परिस्थितीचा आढावा घेवुन आग आटोक्यात आणणचे अनुषंगाने योग्य त्या सुचना दिल्या व नागरिकांशी सुसंवादसाधुन संपूर्ण परिस्थीती आटोक्यात आणली.सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी साो. पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शिवाजी पवार साो. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार श्री. गणेश जामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, श्री. संतोष इंगळे, पोलीस उप निरीक्षक, श्री. पंडीत आहिरे पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार पोशि तानाजी बनसोडे व पोशि मच्छिंद्र टिके, पोशि/धनराज बनसोडे, पोहवा/निलेश अरगडे, मपोहवा/लता पारधी यांनी मिळून केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास श्री. पंडीत आहिरे, पोलीस उप निरीक्षक एमआयडीसी भोसरी पोस्टे हे करीत आहेत.

प्रतिनिधी.लहू लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents