

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे
खेड तालुक्यातील आदर्श पिंपरी बुद्रुक येथे मा. आदर्श विस्तार अधिकारी सुगंधा बाळासाहेब भगत यांनी निर्मल बाल विकास संस्था या ठिकाणी जाऊन विविध उपक्रम राबवून आपला जन्मदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी निर्माण बाल विकास संस्थेमधील २५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला तसेच त्यांना खाऊ वाटप केला. समाजाची सामाजिक बांधिलकी म्हणून आणि पर्यावरण संतुलन राखावे म्हणून त्यांनी वृक्ष लागवड देखील केली आहे. यावेळी विद्युत पारेशान कंपनी चाकणचे मा. अभियंता बाळासाहेब भगत व नातू विहान मेहता समवेत पत्रकार दत्ता भगत, निर्मल बाल विकास संस्थेचे गीता सावंत, प्रियंका गायकवाड, उमाताई गायकवाड आणि सचिन सावंत उपस्थित होते. तसेच त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उच्च विभूषित असे शिक्षण घेऊन जीवनामध्ये चांगले करिअर करावे अशा प्रकारचा तोला मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. जन्म दिवसासाठी केक न कापता अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे स्पष्ट मत दत्ता भगत यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या स्तुत उपक्रमाचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.