पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय दिनांक १३/१०/२०२२ चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन रोहकल रोडवरील युसूफ काकर यांचे खुनाचे गुन्हयातील सहा आरोपी जेरबंद व सहा विधीसंघर्षीत बालके ताब्यात

Spread the love
सदचा गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी चाकण परीसरातून पलायण केले होते. चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाने अतिषय कौशल्यपूर्ण तपास करीत सदर गुन्हयातील मुख्य आरोपीस जळगाव येथुन व इतर ठिकाणाहून असे पाच आरोपी व चार विधीसंघर्षीत बालके याना ताब्यात घेतले आहे. तर गुन्हे शाखा युनिट ३ यांनी दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले. तसेच गुंडा स्कॉड पिंपरी चिंचवड यांनी एक विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रणव शिंदे व आनंदा कोरमशेटटी यांना चाकण पोलीस स्टेशन कडील डी बी पथकाने जळगाव येथुन अटक केलेली आहे. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) प्रणव उर्फ पन्या संजय शिंदे वय १९ वर्षे, २) आनंदा हनुमंत कोरमशेटटी वय १९ वर्षे, ३) निशान देवेंद्र बोगाटी वय १८ वर्षे, ४) कुलदिप संजय जोगदंड वय १९ वर्षे, तसेच व त्यांना गुन्हयात मदत करणारे आरोपी नामे ५) अशोक शंकर चव्हाण वय ३२ वर्षे, ६) अजय अंकुश कांबळे वय २४ वर्षे सर्व रा. चाकण ता खेड जि पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच एकुण सहा विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकुण १२ जनांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्हयात एकुण सहा लोखंडी कोयते, तीन मोटार सायकली असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि प्रकाश राठोड हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सपोफौ सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, सुदर्शन बर्डे, भैरोबा यादव, मपोना
भाग्यश्री जमदाडे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन
गायकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents