

प्रेसनोट
दि.१४.१०.२०२२
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी म्हाळुंगे एमआयडीसी चौकी हदद्दीतील दुहेरी खुनातील आरोपीस ३६ तासाचे आत गजाआड
दिनांक 08/10/2022 रोजी सायंकाळी 18.30 वा. सुमारास मौजे म्हाळुंगे चौकीचे हहदीतील सावरदरीगाव मध्ये भक्ती अपार्टमेंन्ट येथे इसम नामे सुरज चव्हाण व अनिकेत पवार यांचा अप अपसातील वादातुन इसम नामे प्रदिप दिलीप भगत वय 21 वर्ष, रा. सावरदरी, शिवम पार्क रूम नं.24 तिसरा मजला, ता.खेड, जि. पुणे. मुळ रा. गिभा, ता. मंगळुरपिर, जि.वाशिम याने चाकुच्या सहायाने भोकसुन खून करून त्याचे कडील होंडा शाईन मोटार सायकल वरून पळुन गेला असल्याने म्हाळुंगे चौकी गु.र.नं. 1592/2022 भा.द.वि.क. 302, अर्म अॅक्ट 4.27 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
चाकण औद्योगीक परिसरात झालेल्या दुहेरी खुन हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आमचे व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे मार्गदर्शनाखाली, युनिट 3. कडील व.पो.नि. शैलेश गायकवाड व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना तपासकामी सुचना देवून वेगवेगळया टिम तयार करुन एक टिम घटनास्थळावरील परीसरात सदर आरोपीचे संपर्क असणारे त्याचे नातेवाईक मित्र यांना ताब्यातघेवून त्यांचेकडे रात्रभर चौकशी केली असता सदर आरोपी हा त्याचे मुळगावी गेला असल्याबाबत माहीती मिळाल्याने सदरची माहीती वाशिम येथे रवाना झालेल्या टिम यांना देण्यात आली.
वाशिम येथे पाठविण्यात आलेल्या टिम मधील पोलीस हवा. 755 आढारी, पो.ना. 1456 भोसुरे, पो.ना. 1666 भालचिम, पोशि. 2718 सूर्यवंशी यांनी सलग 12 तास प्रवास करून 600 कि.मी. अंतरावरती वाशिम येथे आरोपीचे मुळ गावी गिंभा, ता. मंगळुरपिर, जि.वाशिम येथुन आरोपीचे रहाते घरातुन आरोपीचा भाऊ नामे निलेश दिलीप भगत वय 22 वर्ष व आरोपीचा मामेभाउ रोशन सुरेश इंगवले वय 23 वर्ष, रा. रूई ता. मानोर, जि.वाशिम यास ताब्यात विश्वासात घेउन कौशल्यपूर्वक तपास करून सदर आरोपी बाबत माहीती विचारली असता त्याने त्याचा भाउ प्रदिप भगत हा पहाटे 5.30 वा. चे सुमारास त्याचे मामाचे गावी रूई ता.मानोर जि.वाशिम येथे राजु वसंत इंगवले यांचे शेताचे तांडया मध्ये लपुन बसला असले बाबत सदर पथकास माहीती मिळाल्याने त्याचा सदर ठिकाणी शोध घेत असताना तो तेथील जंगला मध्ये पळून गेला त्याचा सदर तपास पथकाने त्याचा स्थानीक पोलीसांचे मदतीने जंगल परीसरात रात्रभर शोध घेवून सदर आरोपी प्रदिप दिलीप भगत वय 21 वर्ष, रा. सावरदरी, शिवम पार्क रूम नं. 24 तिसरा मजला, ता.खेड, जि.पुणे, मूळ रा. गिभा, ता. मंगळूरपिर, जि.वाशिम यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता सदरचा गुन्हा यातील आरोपीस यातील मयत इसम सुरज चव्हाण व अनिकेत पवार यांनी त्यांचे बिल्डींग मध्ये येण्यास विरोध केल्याचे कारणावरून त्यांचा खुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीस रिपोर्टसह चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत म्हाळुंगे चौकीचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. काकासाहेब डोळे. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, यदु आढारी, सचिन मोरे, रूषीकेश भोसुरे, अंकुश लांडे,महेश भालचिम सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, रामदास मेरगळ, सुधिर दांगट, समिर काळे, निखील फापाळे यांनी केली आहे.