
प्रतिनिधी खेड चाकण
दिनांक २१.०६.२०२४प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सर्व रिक्त पदावरील भरती तात्काळ सुरू करा.* श्री.नितीन गोरे – बोर्ड सदस्य मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १८३ वी बोर्ड मीटिंग दिनांक १३ जून २०२४ रोजी कल्पतरू पॉइंट, सायन, मुंबई येथे पार पडली. यावेळी बोर्ड सदस्य श्री.नितीन गोरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले व त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती मंडळाला केली. यात प्रामुख्याने खालील विषय मांडले: वाढते प्रदूषण व बदलते वातावरणीय बदल त्यामुळे वाढणाऱ्या कामाची व्याप्ती तसेच सध्या उपलब्ध असलेले बोर्डातील मनुष्यबळ लक्षात घेता अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवणे बाबत, मंडळातील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी बोर्डाकडून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देणे बाबत. मंडळातील २००९ मध्ये भरती करण्यात आलेले क्षेत्र अधिकाऱ्यांना PF, CPF व ७ वा वेतन आयोग लागु करणे बाबत. बोर्डातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा अपघाती विमा व मंडळाकडुन कुंटुबाला अर्थ साहाय्याची तरतुद करण्या बाबत. राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी बोर्डाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणे बाबत. वाढत्या प्रदूषणामुळे व वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्व सरकारी आस्थपानांना त्यांच्या परिसरात अथवा पडीक जमिनीवर जास्तीत जास्त वृक्ष रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याच्या सूचना करणे बाबत. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी सालाबादप्रमाणे आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने “पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी” हा उपक्रम राबवणे बाबत. तसेच अन्य महत्वाच्या विषयांना यावेळी मंजूरी देण्यात आली, सिंगल युज प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिम राबविणे बाबत, पर्यावरण पूरक गणेशोत्सव अधिक व्यापक साजरा करण्यासाठी “शहाणपण देगा देवा” या संकल्पनेतून जनजागृती करण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करणे बाबत, सीड बॉल यंत्रे खरेदी करून प्रमुख शासकीय कार्यालयांना वितरित करणे बाबत, हॉस्पिटलचा जैविक कचरा व्यवस्थापन साठी बायोमेडिकल वेस्ट वेन्डरसाठी नवीन प्रस्ताव स्वीकारावे व काम सुरू करावे तसेच नदी प्रदूषण चे सर्वेक्षण करणे बाबत इत्यादी. यावेळी बोर्ड मीटिंगमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री.सिद्धेश रामदास कदम, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव, प्रवीण दराडे (भा.प्र.से) तसेच मंडळाचे सदस्य सचिव, अविनाश ढाकणे (भा.प्र.से), मंडळाचे सदस्य श्री नितीन गोरे, आदित्य शिरोडकर, मंडळाचे विभागप्रमुख मोटघरे साहेब वाघमारे साहेब, गुरव साहेब, संगेवार, ठाकूर, आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी लहू लांडे संपादक