

आज रोजी टपरी चालक *दिव्यांग* महिला नामे सौ. लता दुराफे या पोलीस स्टेशनला आल्या व त्यांनी सांगितले की त्यांची किरकोळ वस्तूंच्या विक्रीच्या टपरी मधून रात्री चोरी झालेली आहे. त्यांच्या टपरीतून त्या चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, चिक्की यांसारखे पदार्थ विकतात व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतात.. त्यांचे साधारण हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान झालेले होते… आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना पिंपरी येथील एका होलसेल दुकानातून 4300/- रुपयांचे चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, चिक्की इत्यादी वस्तू घेऊन दिलेल्या आहेत. उपरोक्त दाम्पत्याने पिंपरी चिंचवड पोलीसचे आभार मानलेले आहेत… माहितीस्तव सविनय सादर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन
प्रतिनिधी संपादक लहू लांडे 9766694886