

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे
बातमीसाठी आमचा क्रमांक 9766694886
खेडतालुक्यातील शिरोली येथील आदर्श विद्यालयांमध्ये सहजयोग परिवार राजगुरुनगर यांच्याकडून सहजयोग कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंगल ताई काळे ,नूतन दरवडे यांनी व्यक्तिमत्व विकास, चरित्र ,एकाग्रता याविषयी मार्गदर्शन केले परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहजयोग तर्फे कुंडली जागृत करणे. अध्यात्मा विषयी चांगले तोला मोलाचे मार्गदर्शन केले वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या काळातील जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल करायचे यासंदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले .यावेळी प्राध्यापक भारत जाधव , प्रा जनार्दन पिंगळे, नामदेव सुतार ,दत्ता ढमाले उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर दौंडकर, बेबी थिगळे, सुधीर दजगुडे, सुनिता मिसाळ ,सोमनाथ सावंत, महेंद्र बनसोडे आणि इयत्ता आठवी ,नववी आणि दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सहजयोगामुळे जीवनामध्ये कोणकोणते बदल होतात .आदर्श जीवन कसे होते. याविषयी मार्गदर्शन मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये समाधानी आणि उत्साही वातावरण दिसून आले. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी दत्ता भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.