

प्रतिनिधी संपादक.लहू लांडे आमची बातमी पाहण्यासाठी व आमचा नंबर 9766694886आपल्या व्हाट्सअप ला जॉईन करा
खेड तालुक्यातील शिरोली गावातील आज दि.२८ रोजी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली पतसंस्था कुलस्वामिनी अंबिका पतसंस्था शिरोली येथील आदर्श उद्योजक अतुल गोविंदराव राक्षे यांची अध्यक्षपदी तर नामदेव शंकरराव वाडेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्थेमध्ये अध्यक्ष देवराम वाडेकर तसेच उपाध्यक्ष तुकाराम पवळे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही दोन पदे रिक्त झाली . यावेळी या जागांसाठी फक्त दोनच अर्ज आले . त्यामध्ये फक्त दोन अर्ज अतुल राक्षे तर नामदेव वाडेकर यांचे आले. तेव्हा अध्यक्षपदी अतुल गोविंद राक्षे तर उपाध्यक्षपदी नामदेव शंकरराव वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड राजगुरुनगर येथे निवडणूक अधिकारी म्हणून सुभद्रा बगाटे यांनी कामकाज पाहिले. या निवडीबद्दल पंचक्रोशीतून अनेक मान्यवर आणि शिरोली गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांन कडून त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे.