
कान्हेवाडी तर्फे चाकण या गावात गेली चार वर्षे रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे.हा रस्त्याचे नुतनीकरण व्हावे व रस्त्रता व्यवस्थित व्हावा यासाठी कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता खेड तालूका यांना खेडच्या मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सचिव श्री.गणेश रौंधळ, सरचिटणीस तृणाल गांडेकर,मनसे जनहित कक्ष खेड तालुकाध्यक्ष विवेक येवले पाटील,मनसे जनहित कक्ष मावळ तालुका उपाध्यक्ष प्रथमेश वीर व मनसे कार्यकर्ते विशाल कड उपस्थित होते.तसेच कान्हेवाडी गावचे सरपंच श्री.नवनाथ(भाऊसाहेब) पवार यांचे विशेष योगदान लाभले.