
शिवसेना चाकण शहर च श्री. पांडूरंग धोंडीबा गोरे
शिवसेना, शहर संघटक चाकण
माननीय
दि.१८१०.२०२२
मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद चाकण
विषय- नगरपरिषद उभारलेल्या मास खांबावरील लाईट दिवे सुरू करणे बाबत.
महोदय
आम्ही खालील सह्या करणारे चाकण शहर शिवसेनेचे पदाधिकारी आपले मनापासून अभिनंदन करतो आपण चाकण शहरात लाईटचे मास खांब उभारून चाकण शहराचा सर्वांगीण विकास केला आहे प्रामुख्याने जय भवानी मंदिर, झित्राईमळा प्राथमिक शाळा, सावता माळी चौक, चाकण नगर परिषद, चक्रेश्वर स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी मास खांब उभारण्यात आले आहे. प्रत्येक खांबावर आठ लाईटचे दिवे आहे. आपणास विनंती आहे की खांब उभारून बरेच दिवस झाले आहेत प्रत्येक खांबावरील आठ दिव्यांपैकी दोन किंवा तीन दिवे चालू आहेत बाकीचे बंदच असतात तरी आपणास विनंती सर्व खांबावरील सर्व दिवे सुरू करून चाकणकरांचा आनंद वाढवावा तसेच चाकणकरांची दिवाळी प्रकाशमय व्हावी ही विनंती.
आपले नम्र