खरपुडी बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आदिनाथ महाराज जुन्नरकर यांचे कीर्तन संपन्न

Spread the love

प्रतिनिधी दत्ता भगत

खरपुडी बुद्रुक दिनांक २१ खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक येथील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आज दि.२१ हभप जुन्नरकर महाराज यांचे कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. सेवे मध्ये नामस्मरण हीच खरी भक्ती. नाम आणि नामच आपले जीवन बदलू शकते. नामात जी ताकद आहे .ती कशातच नाही. तसेच भगवंताने कान ,नाक, डोळे व मूक हे कशासाठी दिले याचे अनेक दाखले देऊन समाजापर्यंत बिंबवले .जिभेचे दोन कार्य असते एक म्हणजे विष बाहेर टाकने, दुसरे म्हणजे अमृत बाहेर टाकने. तुम्ही देवाला सजवा ,देव तुम्हाला सजवेल . भजनामध्ये गाताना प्रेमाने गा. तेव्हा भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्याकडे अहंकार आहे. त्याच्याकडे देव येत नाही. अनेक भक्तीचे उदाहरणे देऊन भाविक भक्तांची मने जिंकली. मा. सभापती दशरथ गाडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आदर्श सरपंच जयसिंग सेठ भोगाडे, चेअरमन संजय गायकवाड, मा. चेअरमन तानाजी बरबटे, आदर्श उद्योजक ऋषी काशीद, निलेश सुपेकर,रामदास गायकवाड यांनी महाराजांना सन्मानित केले. कीर्तनकार महाराजांचे सौजन्य जयसिंग शेठ भोगाडे कृ.उ.बा.स.सं, आदर्श सरपंच, साहेबराव भोगाडे, नामदेव भोगाडे, मंगेश भोगाडे यांनी केले. गायनाची जबाबदारी निवृत्ती महाराज थोरात, काटकर महाराज बरबटे महाराज, पार पाडली. सर्व टाळकरी मंडळी व्यवस्थित साथ दिली. हरीजागर श्रीराम भजनी मंडळ आंबेठाण ,संत सावतामाळी भजनी मंडळ आंबेहोळ यांनी केला. किर्तन सेवा संपल्यानंतर भोगाडे वस्तीतील ग्रामस्थांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना महा प्रसाद वाटप करण्यात आला. या सोहळ्यामध्ये कीर्तन रुपीस सेवेचा लाभ घेण्यासाठी रेटवडी, खरपुडी ,निमगाव आणि पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहे. खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सप्ताहाचे व्यवस्थापन पांडुरंग फंड मंडळ संयोजित पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळ आणि ग्रामस्थ खरपुडी बुद्रुक यांनी उत्कृष्टपणे पार पाडत आहे. सर्व भाविकांकडून कौतुक होत आहे. या सप्तहाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते चैतन्य गायकवाड यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents