

प्रतिनिधी .दत्ता भगत
न्यूज अपडेट
श्रीधरराव वाबळे पाटील विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै श्रीधरराव गोविंदराव वाबळे पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विद्यालयांमध्ये स्कॉलरशिप परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, त्याचप्रमाणे सारथी शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा, या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा व इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाचे पाच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व क्रीडा स्पर्धेमध्ये शाळा स्तरावरती तालुकास्तरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आज दिनांक ०१/०९/२०२४ रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा अनिल गुंजाळ साहेब माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र विद्या परिषद पुणे हे उपस्थित होते त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट चे अध्यक्ष महादेव शेंडकर, सेक्रेटरी सदाशिव काळे,रोटरी क्लब पिंपरी टाउन चे रोटरीयन संतोष भालेकर ,व इतर सर्व रोटरीयन याप्रसंगी उपस्थित होते विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी शिस्तीला खेळाला व आपल्या कौशल्याला महत्त्व आहे असे या प्रसंगी अनिल गुंजाळ यांनी सांगितले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना नमस्कार करून शाळेत यावे तसेच ज्या विद्यालयामध्ये आपण शिकतो त्या शाळेच्या पायरीला नमस्कार करावा म्हणजे आपल्यामध्ये शिक्षणाची जिद्द निर्माण होईल असे सांगितले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुक्ताबाई वाबळे, उपाध्यक्ष माणिकराव वाबळे, सचिव लक्ष्मण खंडागळे, विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक रामदास मारुती पवार त्याचप्रमाणे कै वाबळे यांचे जावई दशरथ शिंदे, दिलीप साबळे ,संपत साबळे ,सुरेश श्रीधर वाबळे, सतारकावस्ती प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय हिंगे, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार माजी विद्यार्थी अतुल थिटे, आदर्श सरपंच द्वारकानाथ टिजगे, चेअरमन शिवाजी वाबळे तात्यासाहेब वाबळे ,दौलत वाबळे, स्वप्निल साबळे, माया शिंदे ,मनीषा पावडे, चांगुना साबळे, सेवानिवृत्त शिक्षक मधुकर चौधरी व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सन १९९७/९८ या वर्षातील माजी विद्यार्थी सुभाष पवळे ,वामन जाधव ,विलास पवळे ,दिनेश पवळे ,अविनाश भालेकर ,गणेश पवार ,शंकर मांडेकर ,सुभाष पवार ,संतोष डुबे ,संतोष घनवट, संदीप तनपुरे बाबाजी डुबे या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या वाचनालयासाठी १०००० रुपये देणगी दिली विद्यार्थ्यांच्या गुण गौरवासाठी बक्षिसे गावचे प्रतिष्ठित नागरिक व मा गुलाबराव बाबुराव पवळे यांच्या प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली विद्यालयाच्या संपूर्ण इमारतीसाठी वर्गखोल्यांसाठी आर्थिक सहकार्य रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट यांच्यावतीने रंग काम करण्यात आले रोटरी क्लब पिंपरी टाऊन च्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ७०००० रुपयाचे आयडल स्टडी ॲप देण्याचे जाहीर करण्यात आले विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रासाठीचे सौजन्य संजय हिंगे यांनी दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील क्रीडाशिक्षक कोहिणकर रामचंद्र यांनी केले व आभार विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक रामदास पवार यांनी आभार मानले