

प्रतिनिधी.लहू लांडे
आज श्री क्षेत्र माळुंगे येथे येथील ग्रामपंचायतच्या माजी सदस्या आणि एक क्रियाशील महिला कार्यकर्त्या, कृतिका रुपेश वाळके यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहिलो.यावेळी आमचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाळके, गावच्या सरपंच अर्चनाताई महाळुंगकर, माजी सरपंच मयुरीताई महाळुंगकर, माजी सरपंच वैशालीताई महाळुंगकर, माजी सरपंच मुक्ताबाई भोपे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे आमचा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश जाधव यांच्यासह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसह महिलांच्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद केला.या एकट्या महाळुंगे इंगळे गावांमध्ये 2000 हून अधिक महिलांना प्रत्येकी ७५०० रुपये बँक खात्यात या योजनेतून मिळाले आहेत. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने आणि त्यातून कुटुंबाच्या महत्त्वाच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने या योजनेचा उपयोग होताना यावेळी महिलांनी सांगितले.