चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाची धडाकेबाज कारवाई, बुलेट मोटार सायकल चोरास अटक त्याचेकडुन चोरीच्या २६ लाख रुपये किंमतीच्या १८ मोटार सायकली जप्त

Spread the love

प्रतिनिधी लहू लांडे

पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठ्या प्रमाणात औदयगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तींकडुन बुलेट मोटारसायकल चोरी होत होत्या. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिपंरी चिचंवड, डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबतच्या प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघडकरण्या बाबत तपास पथकाचे अधिकारी व अमंलदार यांना आदेशीत केले होते. तपास पथकाचे सपोनि प्रसंन्त्र जराड तसेच पथकातील अमंलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील तसेच चोरटा येणारे जाणारे रस्त्यावरील सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनिय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून मोटारसायकल चोरीच्या आरोपींचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेज तपासत असतांना तपास पथकाचे लक्षात आले की, चाकण पोलीस स्टेशन हददीतुन बुलेट मोटार सायकल चोरी करणारा चोरटा हा मोटार सायकल चोरी करुन संगमनेर शहरामध्ये जात आहे. त्यामुळे संगमनेर येथील गोपनीयत बातमीदार यांना सदर बुलेट चोरा बाबत माहिती मिळविण्यासाठी सक्रिय केले.तपास पथकाचे सपोनि श्री. प्रसंन्न जराड, पोहवा हनुमत कांबळे, पोहवा भैरोबा यादव, पोलीस अमंलदार महादेव बिक्कड, शरद खैरणार, किरण घोडके यांचे पथकाला बुलेट चोरा बाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावरुन वरील पथकाने संगमनेर येथे जावुन गोपनीय माहितीचे आधारे बुलेट मोटार सायकल चोरटयाचे ठाव ठिकाण्या बाबत माहिती प्राप्त करुन सापळा रचुन बुलेट मोटार सायकल चोरटा अभय सुरेश खर्डे, वय २३ वर्षे, रा. झोळे ता. संगमनेर जि. अहमदनगर, हल्ली रा. गुजाळ मळा, लक्ष्मी नगर, गुंजाळवाडी रोड संगमनेर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेतले. तसेच सदर मोटार सायकल विक्री मध्ये सहभागी असणारे रविंद्र निवृत्ती गव्हाणे, वय २३ वर्षे, रा. आंजनापुर ता. कोपरगाव जि. अहमदनगर, सुमम बाळासाहेब काळे, वय २४ वर्षे, रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर, यश नंदकिशोर थुटटे, वय २२ वर्षे, रा. चिखली बुलढाणा हल्ली रा. अशोकनगर, नाशिक, प्रेम भाईदास देवरे, वय २० वर्षे, रा. श्रमीक नगर, यशवंत अपार्टमेंट, चौथा मजला, अशोक नगर, नाशिक, मुळ रा. डोंगराळे ता. मालेगाव जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याने चोरीच्या बुलेट मोटार सायकली ११, हिरो होंन्डा स्प्लेंडर मोटार सायकल ०६ व यमाह आर १५ मोटार सायकल ०१ अशा एकुण १८ मोटार सायकली असा एकुण २६,००,०००/- रुपयांचा मुददेमाल जप्त केलेल्या आहेत. सदर आरोपीकडे तपासा दरम्यान चौकशी केली असता अभय सुरेश खर्डे हा ऑनलाईन अॅवेटर गेम खेळण्याचा सवयीचा होता, सदर ऑनलाईन गेम मध्ये तो यापुर्वी खुप पैस हारल्यामुळे पैस कमावण्याकरीता आरोपीने व त्याचे साथीदारांनी माहगडया बुलेट गाडया चोरी करून पैसे मिळविले व सदर पैसे पुन्हा ऑनलाईन गेम मध्ये हरले आहे. आरोपीने चोरी केलेल्या मोटार सायकलींचे वर्णन खालील प्रमाणेअनं जप्त वाहन१रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ३५० सी सी मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ३५० सी सी मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ३५० सी सी मोटार सायकलगुरनं कलमचाकण पो स्टे कडील गुरनं ५४४/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ६०७/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ५५४/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेरॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ३५० सी सी मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ३५० सी सी मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ३५० सी सी मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासीक मॉडेलची ३५० सीसीची मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची ३५० सी सी बुलेट मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची ३५० सी सी बुलेट मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची ३५० सी सी बुलेट मोटार सायकलरॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकलस्प्लेंडर मोटारसायकल तीचेवर नंबर प्लेट नसलेलीस्प्लेंडर मोटारसायकल तीचेवर नंबर प्लेट नसलेलीयमाह कंपनीची R15 मॉडेलची नंबर नसलेलीस्प्लेंडर मोटारसायकल तीचेवर नंबर प्लेट नसलेलीस्प्लेंडर मोटारसायकल तीचेवर नंबर प्लेट नसलेलीस्प्लेंडर मोटारसायकल तीचेवर नंबर प्लेट नसलेलीस्प्लेंडर मोटारसायकल तीचेवर नंबर प्लेट नसलेली५चाकण पो स्टे कडील गुरनं ६६२/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ६६०/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ७१६/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ५३१/२०२४ वी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ५८०/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ७०४/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेचाकण पो स्टे हददीतुन आंबेठान रोड जी एम वाईन बार समोरुन चोरी गेलेली’चाकण पो स्टे कडील गुरनं ३४३/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ३६९/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेमंचर पो स्टे कडील गुरनं ३६५/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणेमंचर पो स्टे कडील गुरनं ३२७/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेतपास चाल आहेतपास चाल आहेचाकण पो स्टे कडील गुरनं ३३३/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणेचाकण पो स्टे कडील गुरनं ७२१/२०२४ बी एन एस कलम ३०३(२) प्रमाणेसदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिंकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे श्री. नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि प्रसंन्त्र जराड, सपोनि गणपत धायगुडे, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, राजु जाधव रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनिल भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.(डॉ. शिवाजी पवार)पोलीस उप आयुक्तपरिमंडळ-३, पिंपरी चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents