

प्रतिनिधी .सचिन आल्हाट
चाकण : पठारवाडी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या प्रचार दौरा निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वाडीतील ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले. मोहिते पाटील यांनी बोलताना तालुक्याचा विचार करता मतदार यादीत नावे जरी जास्त असली तरी लोक कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात बाहेरगावी असल्याने विधानसभा निवडणुकीत मतदान फक्त अडीच ते तीन लाख होत असल्याची खंत व्यक्त केली. चाकण शहराची औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असून नागरिकांना पाणी, विज तसेच मूलभूत गरजा पुरविणे हे जिगरीचे काम असल्याचेही सांगितले. तसेच महायुती ची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी खेड तालुक्यातीला माझ्या रुपाने मंत्री पद देण्याने ठरवले असून मी ते स्विकारण्यास सक्षम असुन खेड तालुक्याचा चांगला विकास करेल असेही मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी चाकण शहरातील मोहिते पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.