
प्रतिनिधी . लहू लांडे
खेड तालुक्यातील गुळाणी येथील श्री सटवाजी बाबा मंदिरामध्ये हेमंत पांडे विकास सोसायटी मा. चेअरमन व विद्यमान संचालक यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सेवापूर्ती समारंभ निमित्त श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. बैरागी एकता प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचे स्नेहसंमेलन घेण्यात आले. यावेळी राजे शिव महाराज, श्रीराम ,श्रीबालाजी, श्रीवीर बंदा बैरागी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ह. भ .प .जानकीदास वैष्णव आळंदी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावरती शिवव्याख्यान सांगितले .प्रा. डॉ. के पी बैरागी यांनी वीर बैरागी यांचा जीवनपट व्याख्यानातून स्पष्ट केला आहे .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळाजी वैष्णव उपाध्यक्ष यांनी केले. आभार प्रदर्शन रवी पांडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी गुळाणी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ, महिला भगिनी आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वात शेवटी महाप्रसादाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली