

प्रतिनिधी . लहुजी लांडे
श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दत्तनगर ,खरपुडी बुद्रुक. ता. खेड येथे उत्साही वातावरणात सुरू आहे. आज दिनांक १० डिसेंबर २०२४ मंगळवारी रोजी ह.भ. प. माऊली महाराज पिंगळे( पाबळ) यांचे सुश्राव्य कीर्तन रुपी सेवा झाली . आपल्या कीर्तनामध्ये काम, क्रोधावर विजय मिळवावा आणि देवाचे दास व्हावे. प्रत्येकाने नामस्मरण करावे. माणसांमध्ये असलेली बाधा ,गर्व हे सर्व दूर करावे . भगवंताचे दास व्हावे. काळ फक्त भगवंतालाच घाबरतो . आपल्या स्वप्नात संसार होतो. संतांच्या स्वप्नात देवाचा संसार येतो. देवाचे नामस्मरण जर केले नाही तर ग्राम, क्रोध आपल्याला त्रास देतो असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. महाराजांनी अनेक वेगवेगळे दाखले देऊन सर्व भाविक भक्तांची मने जिंकली. यावेळी गायक म्हणून ह .भ. प. निवृत्ती महाराज थोरात, बबन पवळे ,मारुती पराड, मल्हारी भोगाडे, काळुराम काळे, दत्तात्रेय बरबटे ,आबा भगत यांनी सुरेख असे गायन केले .हार्मोनियमची साथ ह. भ .प. साहेबराव पोटवडे यांनी दिली. रेटवडी, खरपुडी, निमगाव परिसरातील टाळकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक भाविक भक्तांनी या कीर्तनरुपी सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे आयोजन आणि नियोजन सुरेख असल्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचं कौतुक होत आहे.