
प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील आदर्श गाव गुळाणी येथे गुरुवार दि. १२ / १२ / २०२४ रोजी कै. बाबुराव गेनुजी पिंगळे पाटील विद्यालय, गेली दोन वर्षापासून टाटा टेक्नालॉजीस् व विज्ञान आश्रम, पाबळ यांचे संयुक्त विद्यमाने माहिती तंत्रज्ञानाची ओळख ( IBT ) हा उपक्रम सुरु आहे. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष – प्रा शिवाजीराव पिंगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे – श्रीमती कृष्णन उमा ( मॅनेजर, कॉर्पोरेट ससटेन अबेलिटी ), डॉ. योगेश कुलकर्णी ( मॅनेजर, IBT उपक्रम, विज्ञान आश्रम पाबळ ) श्री. यशवंतराव पिंगळे ( सचिव), संदिप पिंगळे ( अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) हे होते. यावेळी कृष्णन् उमा यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.डॉ. योगेश कुलकर्णी यांनी ज्ञान जगामध्ये खुप झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले. आपण खुप काही कृतीद्वारे शिकू शकतो. असे त्यांनी सांगितले. प्रा. शिवाजीराव पिंगळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये खुप मोठा बदल झाल्याचे सांगितले.या उपक्रमाच्या माध्यमातून विदयालयात शेती, गृह आरोग्य, थ्रिडी प्रिटिंग, इलेक्ट्रिशियन,
अभियांत्रिकी असे विभाग आहेत. या विभागांच्या माध्यमातून इ.८ वी ते इ. १० वी चे विद्यार्थी आठवड्यातून एक दिवस यामध्ये काम करतात व काम करता-करता शिकतात. आजपर्यंत शेती चे विभागाचे माध्यमातून सेंद्रिय खताचा वापर करून मेथी, कोबी, पालक, कोशिंबीर इ. उत्पादने घेतली आहेत.तसेच गांडूळ खत निर्मिती केली आहे. अभियांत्रिकी या विभागाच्या माध्यमातून शेती युक्त अवजारे तयार केली आहे. शिवाय शेड बांधने, पार्टीशन इतर विभागांचा शेटअप तैयार केला आहे. गृहआरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध खाद्य पदार्थ जसेकी वडा पाव, भजी, पोहे, चहा, नानकेट बिस्किट्स, लाडू, पॉपकॉन, चिक्की बनविली आहे. शिवाय रक्तगट, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणे इ. कामे विद्यार्थी स्वतः करतात. इलेक्ट्रिशियन विभागामध्ये लाईट माळ तयार करणे. आर्थिंग देणे, वर्गातील फिटिंग, बोर्ड बनविणे. इ. कामे मुले करू लागली आहे.थ्रिडी प्रिंटिंग या विभागात मुले विविध प्रकारचे जॉब, शैक्षणिक प्रतिकृती तयार करु लागली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक – आदर्श मुख्याध्यापक श्री. निलिम कदम यांनी केले. तर उपक्रम माहिती श्री.सुरज देवमुंडे यांनी दिली.
यावेळी (IBT) निदेशक रुचिरा रोडे, नम्रता रोडे, ऐश्वर्या पांडे मॅडम, संतोष ढेरंगे, गणेश पिंगळे, स्वेता पिंगळे मॅडम, सुयोग वारघडे व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शरद फाकटकर, वैशाली हलकरे, सपना केदारी, प्रशांत राक्षे, विठ्ल कारभळ, चंद्रकांत होले इत्यादींनी केले. आभार संस्थेचे सचिव व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष यशवंतराव पिंगळे यांनी मानले.

