

दि.12. परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, तोडफोड केल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच देशद्रोह कृत्य करणाऱ्या देशद्रोही दत्ता सोपान पवार याला राजद्रोहाची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संलग्न रिपब्लिकन कष्टकरी शेतकर संघटना यांच्या वतीने करण्यात आल. तसेच परभणी जिल्हा मधील आंबेडकरी जनतेचे व कार्यकर्त्यांचे चालू असलेले कोंबिंग ऑपरेशन हे तात्काळ थांबवण्यात यावे. अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी सांगितले .
या आंदोलनाला संदीप साळुंके,तुषार गायकवाड, विकास शिंदे,विनोद हिवराळे, अलकाताई गुंजाळ,बाळासाहेब मोरे,अतुल देखणे, मारुती साबळे, निरंजन देखणे, सोनू काळे,हरीश कांबळे, राहुल, रोकडे, सागर शिंदे, सोमनाथ दळवी इ. उपस्थित होते. खेड येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यापासून ते तहसील कार्यालय खेड घोषणा देत मोर्चा काढण्यात आला तसेच श्री. जोगदंड नायब तहसीलदार खेड यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनाच्या वेळी वंदे मातरम, भारत माता की जय, भारतीय संविधानाचा विजय असो, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
