

रेटवडी दि.१४
खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी येथील श्री स्वामी समर्थ मठा मध्ये दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . सकाळी सात ते नऊ श्रींचा अभिषेक आणि नऊ वाजता श्रींची महाआरती झाली. परमपूज्य गुरुवर्य विजय महाराज कावळे यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना सुश्राव्य असे चिंतन सांगून सर्व भक्तांचे मने जिंकली. नंतर आलेल्या सर्व भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप काका पवार ,उपाध्यक्ष विकास काळे , सर्व संचालक मंडळांनी व स्वामी भक्तांनी केले. रेटवडी, खरपुडी, निमगाव आणि परिसरातील अनेक भाविक भक्ताने दर्शनाचा लाभ घेतला.

